Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरे देवा…जिल्ह्यात २५३ तर जळगाव शहरात ६५ नवीन कोरोना बाधीत !

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आज नवीन २५३ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात विशेष म्हणजे जळगाव शहरासह जामनेर, चाळीसगाव, रावेर आणि भुसावळ तालुक्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण २५३ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ६५ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल जामनेर-३०, चाळीसगाव-२६, रावेर-२१, भुसावळ-२० आणि मुक्ताईनगर-१९ असे रूग्ण आढळून आले आहे. तर अन्य ठिकाणांचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण-१३, अमळनरे-१, चोपडा-१२, पाचोरा-८, भडगाव-०, धरणगाव-९, यावल-२, एरंडोल-३, पारोळा-१२, बोदवड-१२ अशी रूग्ण संख्या तालुकानिहाय आहे.

तालुकानिहाय आकडेवारी याप्रमाणे
जळगाव शहर-१३३७, जळगाव ग्रामीणी- २५४, भुसावळ-५४९, अमळनेर-४५३, चोपडा-३६४, पाचोरा-१३०, भडगा-२६५, धरणगाव-२४४, यावल-३०७, एरंडोल-२७७, जामनेर-३२३, रावेर-४१७, पारोळा-३१३, चाळीसगाव-१४३, मुक्ताइनगर-१४७, बोदवड-१८४, अन्य जिल्हा-१७ असे आकडेवारी आहेत.

दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ५७२४ इतका झालेला आहे. यातील ३३८३ रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या कोविड केअर सेंटरमध्ये-१४१४; कोविड हॉस्पीटलमध्ये-१२७ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ४६९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ६ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ३२१ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

Exit mobile version