Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरेच्चा….! *मार्कशीटवर तारीख १० अन वेबसाइटवर निकाल मात्र ७ एप्रिललाच

 

 

जळगाव  : प्रतिनिधी  ।  कवयित्री  बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या  संकेत स्थळावर ३ दिवस आधीच परीक्षांचे निकाल प्रसिद्ध करण्याचा पराक्रम प्रशासनाने केला आहे 

 

प्रभारी राजमधील भोंगळ कारभार एन एस यू आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी चव्हाट्यावर आणत विद्यापीठ प्रशासनाला दुरध्वनी वरुन चांगलेच धारेवर धरले.

कोरोनाच्या काळात सध्या   सर्वच कामकाज  आॅनलाईन असतांना विद्यापीठाची अधिकृत माहिती देणारी वेबसाइट योग्य रित्या अपडेट ठेवणे गरजेचे असते, परंतु विद्यापीठामध्ये सध्या प्रभारी राज सुरू आहे ज्या पध्दतीने पूर्णवेळ कुलगुरूंच्या काळात विद्यापीठाचा भोंगळ कारभार सुरू होता तसाच आता ही सुरूच असल्याचे दिसून आले.

 

विद्यापीठाच्या फार्मसीच्या विद्यार्थांचा  विद्यापीठाच्या वेबसाइटवर काल   निकाल जाहीर करण्यात आला वेबसाइटवर निकालाची तारीख ७ एप्रिल  आहे परंतु विद्यार्थ्यांच्या निकालपत्रकावर मात्र १० एप्रिल  दिसते  आहे.

 

विद्यार्थ्यांना भविष्यातील तारखेचे निकाल हाती पडले या सर्व गोष्टींमुळे विद्यापीठ प्रशासन किती गोंधळून गेले आहे हे दिसून येत आहे

 

विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराबद्दल जिल्हा एन एस यू आय तर्फे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दुरध्वनीवरुन चांगलेच धारेवर धरले व  जाब विचारला असता प्रशासनानेदेखिल चुक मान्य करून  दिलगिरी व्यक्त केली

Exit mobile version