Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अयोध्येतील विमानतळाला रामाचे नाव

लखनऊ : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. अयोध्येत तयार होणाऱ्या विमानतळाला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ, अयोध्या हे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली .

यासंबंधी राज्य विधानसभेत संमत करण्यात आलेल्या प्रस्तावित संकल्पाच्या आलेखालाही अनुमोदन देण्यात आलं. हा प्रस्ताव राज्य विधानसभेनं संमत केल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे.

उत्तर प्रदशात योगी सरकार रामनगरी अयोध्येला धार्मिक पर्यटनस्थळात रुपांतरीत करत आहे. श्रीराम मंदिर निर्माणासोबतच अयोध्येला विकासाचे पंख लागणार असल्याचं सांगण्यात येतंय. या ठिकाणी विमानतळ निर्माण झाल्यानं प्रवाशांसाठी सोईस्कर ठरेल. हे विमानतळ एनएच २७ आणि एनएच ३३० च्या मध्ये सुल्तानपूर नाकाजवळ तयार होणार आहे. राज्य सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जवळपास ६०० एकर जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाला उपलब्ध करून दिली जाईल. विमानतळ तसंच इतर आवश्यक सोयी-सुविधांच्या निर्मितीसाठी ५२५ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलीय. देश-परदेशातील पर्यटकांसाठी इथं वेगवेगळ्या सोई विकसित करण्यात येत आहेत.

दरम्यान, मंगळवारी लव्ह जिहाद’वर आधारित अध्यादेश उत्तर प्रदेश सरकारनं मंत्रिमंडळात मंजूर केला. यामुळे विवाहासाठी धर्म बदलण्याचा प्रकार गुन्हा ठरणार आहे. यासाठी १० वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. ‘बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०’ असं या कायद्याला नाव देण्यात आलंय.

Exit mobile version