Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अयोध्येतील राम मंदिरासाठी जनतेतून १ हजार कोटींची उभारणी पूर्ण

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी देशभरात देणगी मोहिम राबवण्यात आली यातून १००० कोटी रुपयांचा निधी ट्रस्टकडे जमा झाला , अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि कर्नाटकातील उडुपी येथील पेजावर मठाचे मठाधिपती विश्वप्रसन्न तीर्थ महाराज यांनी दिली.

 

राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या सहकार्याने या ट्रस्टचे काम चालते. १५ जानेवारीपासून या ट्रस्टने देशभरात देणगी मोहिमेला प्रारंभ केला. याद्वारे आत्तापर्यंतच केवळ दीड महिन्यातचं ट्रस्टकडे १००० कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे.

 

विश्वस्त विश्वप्रसन्न महाराज म्हणाले, “दक्षिण भारतातील जनतेनं या मोहिमेला देलेल्या प्रतिसादामुळे मी खूपच आनंदी आहे. निधी गोळा करायच्या कामासाठी मी मोठा प्रवास केला आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या प्रकल्पासाठी मदत दिली आहे. निधीमध्ये वाढ होणं ही मंदिर निर्माणासाठी काम करणाऱ्या संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्वाची बाब आहे. अयोध्येत मंदिर उभारायचं आणि त्यात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची एवढाच ट्रस्टचा उद्देश नाही. तर पुढे जात रामराज्य म्हणजे आदर्श कल्याणकारी राज्य प्रस्थापित करण्याचं या प्रकल्पाचं अंतिम उद्दीष्ट आहे.”

 

राज्यातील सर्व मंदिरं ही संरक्षित करावी अशी मागणी पेजवर यांनी केली आहे. कारण यामुळे मंदिरांच्या जागांवर अतिक्रमण करण्याचा कोणी विचार करणार नाही आणि त्यामुळे भविष्यात वाद होणार नाहीत, असं विश्वप्रसन्न महाराज यांनी म्हटलं आहे.

 

विश्वप्रसन्न महाराज म्हणाले, “जातीवर आधारित आरक्षण देणं हे चुकीचं आहे. आरक्षण हे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर देण्यात यावं. प्रत्येक समजातील लोकांनी त्यांच्या जातीला विशेष दर्जा देण्याविरोधात आवाज उठवायला हवा.”

Exit mobile version