Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अयोध्यानगरात प्रौढ व्यक्तीचा अकस्मात मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अयोध्यानगरातील राहत्या घराच्या बाथरूममध्ये ४६ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीला आली. मृत्यूची कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील अयोध्या नगरातील लिलापार्क अपार्टमेंटमध्ये क्षमेंद्र अरुण कुलकर्णी (वय- ४६, रा. लिलापार्क, मनूदेवी माता मंदिरासमोर, अयोध्यानगर, मुळ रा. अमळनेर) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. ते अशोक लेल्यांड कंपनीत सुपरवायजर म्हणून नोकरीस होते. त्यांच्या सासूबाईंचे निधन झाल्याने त्यांची पत्नी व दोघ मुली हे चंद्रपूर येथे गेल्या होत्या. आज त्या घरी येण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान, क्षमेंद्र यांची बहिण त्यांना फोन करीत होत्या. परंतु क्षमेंद्र हे फोन उचलत नसल्याने त्यांनी शेजारच्यांना ङ्गोन करुन क्षमेंद्रयांच्याबाबत विचारणा केली. यावर शेजारच्यांनी त्यांचा दरवाजा बंद असल्याचे सांगितले. त्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावल्यानंतरही आतून कुठलाच प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा शेजार्‍यांची एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.05:20 PM

Exit mobile version