Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमेरिकेने सोडले जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्यत्व !

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिका आता यापुढे जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने डब्ल्यूएचओला या संदर्भात आपला निर्णय अधिकृत पत्राद्वारे कळविला आहे. दरम्यान, अमेरिकेने एप्रिलपासून डब्ल्यूएचओला दिलेला निधी थांबवला होता.

 

अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने डब्ल्यूएचओकडून आपले सदस्यत्व मागे घेण्याबाबत एक पत्र पाठवले आहे. ६ जुलै २०२१ नंतर अमेरिका डब्ल्यूएचओचा सदस्य असणार नाही. १९८४ मध्ये ठरविलेल्या नियमांनुसार, कोणतेही सदस्यत्व मागे घेतल्याच्या एक वर्षानंतर, डब्ल्यूएचओमधून तो देश बाहेर पडू शकतो. त्यामुळे अमेरिकेचे सदस्य आता एक वर्षानंतर संपुष्टात येणार आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेला डब्ल्यूएचओची सर्व थकबाकी परतफेड करावी लागणार आहे. अमेरिकेने डब्ल्यूएसओशी संबंध तोडल्याने डब्ल्यूएचओ आणि इतर देशांसाठी हा जबरदस्त झटका मानला जात आहे. दरम्यान, याआधीच ट्रम्प सरकारने कोरोना व्हायरस प्रकरणात चीनच्या अंतर्गत डब्ल्यूएचओ काम करत असल्याचा आरोप केला होता.

Exit mobile version