Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमेरिकेत हंता विषाणूचा संसर्ग : महिला अत्यवस्थ

मिशिगन, वृत्तसेवा अमेरिका कोरोना महामारीचा मुकाबला करीत असताना  आता आणखी एका विषाणूचे  संकट ओढवल्याची भीती आहे.  मिशिगनमध्ये एका महिलेला हंता विषाणूची लागण झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. ही महिला उंदरांच्या संपर्कात आली होती. त्यानंतरच तिला संसर्ग झाला असल्याचे म्हटले जात आहे.

 

मिशिगनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाशटेनाऊ काउंटीमधील महिलेला फुफ्फुसात त्रास जाणवत होता. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही महिला घराची साफसफाई करत होती. त्याच दरम्यान उंदरांच्या संपर्कात आल्याने तिला हंता विषाणूची लागण झाली असण्याची शक्यता आहे. अमेरिकेत हंता विषाणूचे जानेवारी २०१७ पर्यंत ७२८ प्रकरणे समोर आली होती. हंता विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, हगवण, स्नायूदुखी आदी तक्रारी आढळतात. यावर वेळीच उपचार न केल्यास श्वसनाची तक्रारही उद्भवते. तसेच, फुप्फुसात पाणी होऊन संबंधित रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

 

Exit mobile version