Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमेरिका : फायझर लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी

 

 

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था । ब्रिटननंतर आता अमेरिकेनंही अमेरिकन कंपनी फायझर आणि जर्मन फार्मा कंपनी बायोएनटेकद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या कोरोना लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली आहे.

सुरूवातीपासूनच अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसल्याचं दिसत आहे. जॉन हापकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत १५.५ दशलक्ष लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्यापैकी आतापर्यंत २ लाख ९२ हजार जणांनी प्राण गमावले आहेत.

अमेरिकेने लस तयार करणारी कंपनी मॉडर्नाकडूनही १०० दशलक्ष डोस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकन सरकारच्या सल्लागार समितीनं फायझरच्या लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली. या मुद्दावर झालेली बैठक तब्बल आठ तास सुरु होती. बैठकीदरम्यान एफडीएच्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी १७ विरूद्ध ४ मतांनी लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली. एक सदस्य प्रक्रियेत सहभागी झाला नव्हता.

सध्या फायझरच्या लसीला मिळालेली परवानगी ही अंतरिम परवानगी आहे. कंपनीला अमेरिकेत लसीची विक्री करण्यासाठी आणखी एकदा अर्ज करावा लागणार आहे. या लसीमुळे सध्या जो फायदा होणार आहे तो या लसीच्या संभावित दुष्परिणामांपेक्षा अधिक आहे. त्यासाठी या लसीच्या आपात्कालिन वापरास परवानगी देण्यात आली आहे, असं एका तज्ज्ञानं सांगितलं. यापूर्वी फायझरच्या लसीच्या आपात्कालिन परिस्थितीतील वापरास ब्रिटन, कॅनडा, बहरिन आणि सौदी अरेबियानं मंजुरी दिली होती. भारतातही यासाठी कंपनीनं परवानगी मागितली आहे.

गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत करोनामुळे ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.आम्ही वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभारी आहोत. अमेरिकेसमोर लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाचं आव्हान आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित राष्ट्राध्य जो बायडेन यांनी दिली.

 

 

Exit mobile version