Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमृत योजनेच्या पाईपांना भीषण आग

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आयएमआर मैदानावरील कोपर्‍यात असणार्‍या अमृत योजनेच्या पाईपांना आज दुपारी भीषण आग लागली असून यात लाखो रूपयांचे पाईप खाक झाल्याचे वृत्त आहे.

शहरात सध्या अमृत योजनेंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. कामासाठी लागणारे हाय डेफिनेशन पॉलीथन पाईप ४ इंची ७५ मिटर लांबीचे पाईपचे ३० बंडल आयएमआर महाविद्यालयाशेजारी लॉ ग्राऊंडवर ठेवण्यात आले आहे. सोमवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास पाईपांना अचानक आग लागली. आगीमध्ये पाईपचे १५ बंडल खाक झाले असून तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, विशाल राजेंद्र ठाकूर व राहूल पाटील पहेलवान हे दोन्ही मैदानावर मोबाईलमध्ये फोटो काढत होते. यादरम्यान दोन ते तीन जणांनी सिगारेट फेकल्याने आग लागल्याचे दिसून आले. विक्कीने तत्काळ शहर पोलीस ठाण्याचे प्रितम पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटील यांनी त्याला जिल्हापेठच्या नाना तायडे यांना संकर्प साधण्याचे सांगितले. माहिती मिळताच तायडे यांनी अग्निशमन विभागाला प्रकार कळविला. व ते स्वत शासकीय वाहनाने कर्मचारी प्रशांत कणखरे, रामेश्‍वर ताठे, प्रशांत जाधव यांनी घटनास्थळ गाठले.

अग्नीशमन दलाचे दोन आणि जैन इरिगेशनच्या एका बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. जैन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आर. बी. पाटील, नारायण ललवाणी, प्रोजेक्ट इंजिनिअर दीपक जामोदकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version