Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली

 

मुंबई : वृत्तसंस्था ।“मेडिकल कंडिशन…सर्जरी…मी लिहू शकत नाही”, असा अमिताभ बच्चन यांनी लिहलेला ब्लॉग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ब्लॉगमुळे त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

 

अमिताभ हे सोशल मीडियावर  सक्रिय असतात. ते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत त्यांचे विचार व्यक्त करत असतात. नुकताच त्यांनी एक ब्लॉग लिहलेला असून, तो चर्चेत आहे.

 

अमिताभ यांनी हा ब्लॉग शनिवारी रात्री लिहिला होता. ‘मेडिकल कंडिशन…सर्जरी…मी लिहू शकत नाही, असे अमिताभ यांनी त्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. त्यांच्या हा ब्लॉग पाहिल्यानंतर चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. नक्की शस्त्रक्रिया कसली आहे? कुठे आणि कधी ही शस्त्रक्रिया होणार? असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहेत.

 

 

दरम्यान, अमिताभ यांनी केलेल्या ट्विटने देखील सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ते ट्विट पाहिल्या वर चाहत्यांनी ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.

Exit mobile version