Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर येथे कृषि दिनानिमित्त प्रतिमापूजन व अभिवादन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी पंचायत समिती अमळनेर येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. कृषी संजीवनी सप्ताह २५ जून ते १ जुलै कार्यक्रमाचा समारोपही यावेळेस करण्यात आला.

 

यावेळी तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी प्रास्ताविक करताना वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्याचा जसे रोजगार हमी योजना, कृषी विद्यापीठ स्थापना, विविध धरणांची बांधणी, कोयना प्रकल्प, कापूस एकाधिकार योजना यासारख्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना त्यांनी राबविल्या याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तर नंतर महाबीजच्या मोहिनी जाधव मॅडम यांनी जैविक औषधे माती परीक्षण व बीज प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून त्यांनी त्याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखविली.

 

यावेळी पाणी फाउंडेशनचे तुषार पाटील यांनी तालुक्यातील त्यांनी केलेल्या कार्याचा सखोल अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर यांनी वसंतरावजी नाईक यांच्या योजनांचे फलित शेतकऱ्यांना दिशादर्शक आहे व ते आजही लागू पडते, यावर माहिती देऊन सेंद्रिय शेती बाबत प्रत्येकास स्वतः पुढे यावे लागेल असेही सांगितले.

 

यावेळी कृषी विभागाचे कर्मचारी अविनाश खैरनार, कृषी पर्यवेक्षक, दिपक चौधरी कृषी सहायक, योगिता लांडगे कृषी सहायक यांना प्रतिनिधिक स्वरूपात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पिक विमा सप्ताह १ जुलै ते ७ जुलै चे उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय तृणधान्य विकास कार्यक्रम सन २०२३ अंतर्गत तृणधान्यातील आहारातील महत्त्व याविषयीचा श्रीमती दिपाली सोनवणे यांनी यूट्यूब व्हिडिओ तयार  केलेला असून मान्यवरांच्या हस्ते प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी मारवाड अविनाश करणारे यांनी केले व आभार प्रदर्शन दीपक चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी, अमोल कोठावदे, योगेश खैरनार, भूषण पाटील यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version