Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर येथील भक्तांची पायीवारी; शेगांवला रवाना

अमळनेर प्रतिनिधी | येथील मुंदडानगर येथील संत गजानन महाराज यांच्या मंदिरात सकाळी भाविकांनी महाआरती करून भक्तांची पायीवारी शेगांवला आज रवाना झाली आहे.

तालुक्यातील मुदडानगर येथील संत गजानन महाराज यांच्या मंदिरात सकाळी भक्तांनी महाआरती करून शिस्तबद्ध पद्धतीने वाजतगाजत शेगांवला पायीवारी आज निघाली. दरम्यान रस्त्यावर दोन्ही बाजूंना महिलांनी रांगोळी काढून वातावरण भक्तीमय केले. संत गजानन महाराज यांच्या गाण्यावर महीला व पुरुष नाचत आपला आनंद व्यक्त केला. अशोक भावे, नितीन भावे, रघूनाथ पाटील , ज्योती पवार व गजानन भक्त महीला व पुरूष यांनी गजानन महाराज यांच्या वारीची तयारी करत गजानन पादूकापूजन केले. ९ नोव्हेंबर पासून १४ नोव्हेंबर पर्यंत पायीवारीचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसात पायीवारीतील गजानन भक्तांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवन, चहा, रात्रीचे जेवन व मुक्कामाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, औषध पुरवठा दानशूर गजानन भक्तांनी केली आहे. या पायी वारीचे नियोजन संस्थानचे अध्यक्ष आर. बी. पवार व त्यांच्या वारी प्रमुख यांनी आयोजन केले आहे. यावेळी शेगांव वारीत मारवड, करणखेडा, सात्री, खापरखेडा, तामसवाडी, सबगव्हाण, कळमसरे सुमटाणे, कावप्रिपी, इंद्राप्रिपी , अमळगांव व इतर गावातील गजानन भक्तांनी पायीवारीत समावेश आहे. यावेळी पायीवारीचे स्वागत मुंदडानगर, विदयाविहार काँलनी, सुरबी काँलनी, पटवारी काँलनी येथील गजानन भक्तांनी जोरदार वारीचे स्वागत केले.

Exit mobile version