अमळनेर पोलिसांचे ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्याचे आवाहन

अमळनेर, गजानन पाटील  । आगामी सण-उत्सवाचा पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले. 

 

बैठकीत आगामी सण-उत्सव पोळा व गणपती उत्सव तसेच पुर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने शासनाने व  जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सुचानांबाबत अवगत करण्यात आले. बैठकीत पोळा सणानिमित्त कुठल्याही प्रकारच्या वाद्य वाजंत्रीसह किंवा साधी मिरवणूक देखील निघणार नाही. सार्वजनिक गणपती  तसेच गावातील सार्वजनिक मूर्तीची उंची ही जास्तीत जास्त ४ फूट व घरगुती गणपती उंची ही जास्तीत जास्त २ फूट राहील असे स्पष्ट करण्यात आले.  गणपती स्थापना व विसर्जन बाबत कुठल्याही प्रकारची मिरवणूक निघणार नाही. अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना गावात जास्तीत जास्त एक गाव एक गणपती बसविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/246499770708631

 

Protected Content