Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर तालुक्यात वाजतगाजत कानुबाई मातेचे विसर्जन

अमळनेर –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  संपूर्ण खान्देशाचे कुलदैवत असलेल्या कानुबाई मातेला आज अमळनेरसह तालुक्यात ठिकठिकाणी सवाद्य मिरवणूक काढून भावपूर्ण निरोप देण्यात आला.

 

अमळनेर तालुक्यातील मारवड गोवर्धन भोरटेक,नांद्री-पातोंडा शहापूर वासरे खर्डे पाडसे दहिवद आदी गावांमध्ये शनिवारी कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली होती. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात कामानिमित्त बाहेरगावी राहणारे भाऊबंदकी, आप्तेष्ट व्यावसायिक असे सगळेच या सणाला एकत्रित आले होते. दरवर्षी नागपंचमी आधी व  नंतरचा शनिवार रविवारी कानुबाई उत्सव साजरा होत असतो.  त्यामुळे साहजिकच प्रत्येक गावात उत्साहाचे वातावरण असते.

दरम्यान आज  डीजे तसेच बँडच्या सवाद्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अबाल वृद्ध तरुण तरुणी यांनी  मनसोक्तपणे फुगडी व नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. त्यांनतर पूजा अर्चा आरती समाप्ती करीत नदीवर कानुबाई मातेचं विसर्जन करण्यात आले.

Exit mobile version