Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर कापूस खरेदी केंद्रास उद्यापासून प्रारंभ — आमदार अनिल पाटील

 

अमळनेर, प्रतिनिधी तालुक्यात मार्केटिंग फेडरेशन कापूस खरेदी केंद्र उद्यापासून म्हणजे २५ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे.

सोमवारी आमदार अनिल पाटील हे मुंबईत गेले होते त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन अमळनेर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याची विनंती केली होती. यावर त्यांनी मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन यांना बोलावून केंद्र तात्काळ सुरू करण्याची कार्यवाही करा अश्या सुचना केल्या त्यानुसार २५ डिसेंबरपासून केंद्र सुरू करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
आमदार पाटील हे सतत पाठपुरावा करीत होते. अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर अमळनेरात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू झाली असून उद्या शुक्रवार दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता हे केंद्र सुरू होणार असून आमदार पाटील यांच्या हस्ते यावेळी येथील लामा जिनिंग सेंटरमध्ये शुभारंभ करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी पणन संचालक संजय पवार, पंचायत समिती सभापती त्रिवेनाबाई पाटील, माजी पं. स. सभापती शाम अहिरे, तालुका सह निबंधक गुलाबराब पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

आमदारांनी दिलेला शब्द केला खरा

कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यास काही तांत्रिक अडचणी असल्याने विलंब होत असताना, काहींनी उगाचच यात चुकीचा गैरसमज शेतकरी बांधवात पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदारांनी कोणत्याही परिस्थितीत सात दिवसात कापूस खरेदी केंद्र सुरूच होणार असा शब्द जाहीरपणे दिला होता. खरंच सात दिवसाच्या आत हे खरेदी केंद्र सुरू होत असल्याने आमदारांनी त्यांचा शब्द खरा ठरविल्याचा प्रत्यय यानिमित्ताने आला आहे.

Exit mobile version