Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात हिंदू नववर्षाचे स्वागत जल्लोषात

अमळनेर गजानन पाटील | अमळनेर शहरात आज गुढीपाडव्या निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यात विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, संघटना तसेच सर्वधर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

 

आज सकाळी हिन्दू नववर्ष स्वागत समिती अमळनेर आयोजित हिन्दू नववर्ष स्वागत यात्रा वर्ष १९ वे सालाबादाप्रमाणे या वर्षीदेखील अमळनेर शहरातील राष्ट्रप्रेमी, धार्मिक, सामाजिक संस्थांच्या व मंडळांच्या सहकार्याने भव्य नववर्ष स्वागत यात्रा आज उत्साहात संपन्न झाली.

 

या यात्रेसाठी शहरवासियानी आपले प्रांगण झाडून, सडा,रांगोळ्या काढून, तसेच घरावर रोषणाई करून भव्य गुढी उभारून, यात्रेवर पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत केले, शिवाय मंगलदेश परिधान करुन सहकुटूंब व मित्रमंडळीसह या यात्रेत सहभागी होवून सर्वांनी शोभा यात्रेचा आनंद लुटला.

 

दरम्यान या शोभायात्रेत तालुक्याचे आमदार अनिल पाटील यांनी हरी भक्त पारायण बाळ गोपाळ यांच्या सोबत छत पावली करीत नृत्य केले. यावेळी आमदार अनिल पाटील यांना ढोल वाजण्याच्या मोह आवरता आला नाही!

Exit mobile version