Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात भगवान श्री महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | येथील सकल जैन समाजातर्फे भगवान श्री महावीर जन्म कल्याण महोत्सव दिनांक चार 4 रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला.

 

शोभा यात्रेची सुरुवात सराफ बाजारातील जैन मंदिरापासून करण्यात आली.शहरातील सर्व प्रमुख मार्गाने जात सुजाण मंगल कार्यालयात शोभयात्रेची सांगता करण्यात आली. शोभायात्रेत भगवान श्री महावीरांची पालखी तसेच पूज्य साधू आणि साध्वीजी म.सा. सोबत लहान मुले व पुरुष वर्ग सफेद वस्त्र व पगडी धारण करून सहभागी झाले होते.तर महिला आपापल्या मंडळाच्या साड्या परिधान करत भगवान श्री महावीरांची मूल्यवान संदेश ची पोस्टर्स हातात धरून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, मिरवणुकी दरम्यान आमदार अनिल भाईदास पाटील ,माजी आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार श्रीमती स्मिताताई वाघ एडवोकेट ललिताताई पाटील तसेच पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील व अन्य मान्यवरांनी जनकल्याणक निमित्त भेट देऊन समाजबांधवाना शुभेच्छा दिल्या.

 

हे होते शोभायात्रेचे वैशिष्ट्य

 

शोभयात्रेत माता त्रिशला राणीला पडलेल्या 14 स्वप्नांचे मोठे पोस्टर्स बनवून 16 गाड्यांवर सुशोभित करण्यात आले होते,तसेच लोणावळा येथून आलेले श्री सिद्ध चक्र जैन ढोल पथकाने मोठी रंगत आणली.व अकोला येथील नमनभाई शाह यांचे संगीतमय धार्मिक गीतांचे सादरीकरन आकर्षण ठरले.

 

समारोपानंतर सुजान मंगल कार्यालयात गुरु महाराजांचे आशीर्वचन झाले,यावेळी जन्म महोत्सव सादर करण्यात आला, नंतर सर्वांनी गौतम प्रसादीचा लाभ घेतला. रात्री अनहदनाद भक्ती विविध पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला,शेवटी जन्म कल्याणक महोत्सव समिती प्रमुख भरत कुमार घेवरचंद कोठारी यांनी आपल्या मनोगतात कार्यक्रम यशस्वी करणाऱ्यांच्या प्रति ऋण व आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बटुकभाई गोसलिया, घेवरचंद कोठारी,डॉ किशोर शाह,संजय गोलेच्छा,सुभाषचंद् ओसवाल,रमेशचंद कोठारी, डॉ रवींद्र जैन, विपूल डागा,राजेश बेदमुथा  विजय पारख,किरणचंद बेदमुथा,कैलास लोढा,भिकचंद छाजेड,ललित बाफना,वृषभ पारख,पारस लूनावत,जितेंद्र कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली सकल जैन नवयुवक मंडळाचे योगेश छाजेड, दिनेश डागा, दिनेश लोढा, सचिन ओसवाल, रोहित सिंघवी, धीरज झाबक,रितेश देसरडा, जितेंद्र पारख, सचिन चोपडा, ध्रुव पारख,रोनक पारख, कुमारपाल कोठारी, मन्नू कोठारी सुनील छाजेड, सौरभ छाजेड, प्रतीक लोढा ,हर्षल बोरा, प्रशांत सिंघवी, अनिल रायसोनी, अक्षय डागा ,गौतम कोठारी ,संदेश कोठारी ,देवेंद्र लुणावत ,जितेंद्र संकलेचा, मुकेश बाफना, चेतन पारख, चेतन गोसलिया, दिनेश कोठारी, धर्मेंद्र कोठारी ,धीरज कोचर दीपक दोशी, चेतन छाजेड, प्रदीप चोरडिया, मिलिंद कोठारी ,दिलीप छाजेड ,गौरव छाजेड ,महावीर बाफना ,नवीन बेदमुथा, केतन शहा, रोनक संकलेचा यांनी परिश्रम घेतले.

 

विविध मांगलिक कार्यक्रमही उत्साहात

 

भगवान श्री महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त दि 29 मार्च ते 4 एप्रिल पर्यन्त विविध मांगलिक कार्यक्रम देखील पार पडले.यात सब खेलो सब जातो,भगवान के जीवनपर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा,धार्मिक अंताक्षरी, रांगोळी स्पर्धा,जाहीर प्रवचन, धार्मिक नृत्य,संस्कारहीन जीवन नाटिका, संगीतमय शक्रस्तव अभिषेक, नवकार मंत्र जाप,विविध विषयांवर नाटिका आदी धार्मिक व मांगलिक कार्यक्रम पार पडले,व अखेरच्या दिवशी शोभायात्रा काढण्यात आली, सर्व समाज बांधवांनी सहभाग घेतला.

Exit mobile version