Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात पत्रकार संघाच्या नियोजित जागेत रंगला पत्रकार दिन सोहळा

अमळनेर, प्रतिनिधी | आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी रोजी अमळनेर येथे अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळील पत्रकार संघाच्या नियोजित जागेत पत्रकार दिन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला.

 

अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी उपस्थिती देऊन आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आ. डॉ. बी. एस. पाटील,उ द्योगपती विनोदभैय्या पाटील, जिजाऊ संस्थेच्या अध्यक्ष अँड. ललिता पाटील, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, डॉ. अनिल शिंदे, न. प.चे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड व प्रशासन अधिकारी संजय चौधरी, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन,अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन व सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत व चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार सुभाष पाटील यांच्या अमृत महोत्सवी गौरव म्हणून तर बाबूलाल पाटील यांचा एलआयसीचे तिसऱ्यादा एमडीआरटी झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित राजकीय पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करून पत्रकार भवनांसाठी योग्य जागा उपलब्ध झाल्याबद्दल पत्रकार संघाचे कौतुक केले व लवकरच या जागेवर भव्य वास्तू उभी राहिल यासाठी शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, सेना तालुकाप्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, वसुंधरा लांडगे, योजना पाटील, माधुरी पाटील तसेच खान्देश शिक्षण मंडळाचे सर्व संचालक मंडळ, माजी आमदार शिरिषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते,अमळनेर अर्बन बँकेचे पदाधिकारी,बाजार समितीचे प्रशासक मंडळ सदस्य, शेतकी संघाचे प्रशासक मंडळ, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, समस्त व्यापारी बांधव, शासकीय अधिकारी, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व भाजपासह सर्व राजकीय व सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती देऊन पत्रकार बांधवांचा विशेष सन्मान केला.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत,सचिव चंद्रकांत पाटील,उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर,संजय पाटील,राजेंद्र पोतदार,किरण पाटील,महेंद्र रामोशे,पांडुरंग पाटील,अमोल पाटील,आबीद शेख,मुन्ना शेख,पांडुरंग पाटील, आर जे पाटील,कुंदन खैरनार,महेंद्र पाटील,संभाजी देवरे,योगेश महाजन,विजय पाटील,उमेश धनराळे,जयंत वानखेडे,काशीनाथ चौधरी,विनोद कदम,राहुल बही रम,ग्रामिण पत्रकार,प्रा.हिरालाल पाटील,बाबूलाल पाटील, श्याम पाटील,अरुण पवार,डॉ विलास पाटील, गणेश पाटील,भीमराव महाजन,समाधान मैराळे, सुरेश कांबळे यासह असंख्य पत्रकार पत्रकार बांधव उपस्थित होते.

Exit mobile version