Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात दोन दिवसीय स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिरास प्रारंभ

अमळनेर –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळग्रह सेवा संस्था, मानिनी फाऊंडेशन (पुणे), लायन्स क्लब,  यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय स्तनाचा कर्करोग विनामूल्य तपासणी (फ्री मेमोग्राफी टेस्ट) शिबिराचा  ५ डिसेंबर रोजी प्रारंभ झाला.

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे पीडीजी डॉ. रवींद्र कुलकर्णी होते. यावेळी ब्रेस्ट कॅन्सर, लेप्रोस्कोपी मार्गदर्शक तथा जनरल सर्जन डॉ. रोहन पाटील (जळगाव), मानिनी फाऊंडेशन (पुणे)च्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट योगेश मुंदडे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. भारती चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रोहन पाटील म्हणाले की, स्तनाच्या कर्करोगाने  देशात प्रत्येक चार मिनिटांत एक महिला दगावत आहे. परंतु, तरीही भीती अथवा घाबरण्याचे कारण नाही. प्रत्येक गाठ कर्करोगाची नसते. स्तनाचा कर्करोग प्रामुख्याने ४० वर्षांपुढील वयाच्या महिलांना शरिरात चरबी वाढल्याने, आरोग्याकडे लक्ष न दिल्याने, आईला कर्करोग असल्यास अनुवंशिकतेने व गर्भनिरोधक गोळ्यांचा जादा वापर केल्याने होतो. यासाठी स्तनांच्या कर्करोगासह गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यासंदर्भात नेहमी स्वतःला सजग ठेवावे. व्यायामाकडे लक्ष द्यावे. ‘मेमोग्राफी टेस्ट’ यामध्ये एक्स-रे काढून या रोगासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे ही चाचणी महिलांनी आवर्जून करून घ्यावी.

डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनीही स्तनांच्या कर्करोगासंदर्भात विविध दाखले देत या रोगासंदर्भात सदैव दक्ष राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. सुमारे पाचशे महिलांनी लाभ घेतला.  शिबिर बुधवार, ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे. शिबिरासाठी पुणे, मुंबई येथून आलेले वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ, मानिनी फाऊंडेशनचे कोअर कमिटी मेंबर्स अनुक्रमे संजय पाटील (कन्हेरे), कृषिभूषण सतीश काटे (कोळपिंप्री), अतुल पाटील (बहादरवाडी), महेश पाटील (रंजाणे), डॉ. दिनेश पाटील (दळवेल), भारती पाटील (चौबारी), छाया पाटील (सडावण), पॅथॉलॉजिस्ट उदय खैरनार, लायन्स क्लबचे सेक्रेटरी महावीर पहाडे, ट्रेझरर अनिल रायसोनी, एमजेएफ विनोद अग्रवाल, झोनल चेअरमन नीरज अग्रवाल, सदस्य जितेंद्र जैन, डॉ. प्रशांत शिंदे, जितेंद्र कटारिया, प्रदीप अग्रवाल, शेखर धनगर, हरिकृष्ण सैनी, प्रितम मणियार, हेमंत पवार, खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, नगरसेवक प्रताप शिंपी, श्याम गोकलाणी, सत्यपाल निरंकारी, लक्ष्मण पंजाबी, विनोद कदम, राजू देशमुख, बाळू पाटील, योगेश महाजन, चंद्रकांत कखरे, राकेश पाटील, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, प्रशासन अधिकारी भरत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

स्नेहा एकतारे यांनी सूत्रसंचालन केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी आभार मानले. दरम्यान सायंकाळी मंदिरात झालेल्या  कार्यक्रमात श्री. महाले यांनी ऑनलाइन अभिषेक बुकिंग प्रणालीचे उद्घाटन केले. तसेच जानेवारी महिन्यापासून आंतरराष्ट्रीय स्तराचे अत्यंत आगळे – वेगळे अद्ययावत व सुसज्ज  ढोल, लेझीम, ताशे नृत्य पथक सुरू करणार असल्याचे जाहीर केले. या लेझीम पथकाच्या माध्यमातून निर्व्यसनी युवा पिढी घडवणे व युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हाही मुख्य उद्देश असल्याचे महाले यांनी स्पष्ट केले.

 

Exit mobile version