Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत

अमळनेर प्रतिनिधी । देशात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिलांना सध्या आर्थिक स्वरूपाचा अडचणींचा सामाना करावा लागत आहे. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी १५ हजार रूपयांची आर्थिक मदत केली.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्याकरिता शासनाकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या अमळनेर येथील देहविक्री करणाऱ्या महिलांना माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याकडून आज एकूण १५ हजार रुपयांची आर्थिक स्वरूपाची मदत करण्यात आली. त्यावेळी त्यांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून रवी पाटील यांच्याहस्ते एकूण ७५ महिलांना प्रत्येकी २०० रुपये महिलेप्रमाणे अनुदान म्हणून देण्यात आले. त्यावेळी आधार संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक रेणू प्रसाद,अध्यक्षा भारती पाटील, संजय कापडे, सईदा शेख, अश्विनी सूर्यवंशी, अनिता बडगुजर, फरीदा शेख, यास्मिन शेख, नंदिनी चौधरी, रजू जैन, तोसिफ शेख आदींनी सहकार्य केले.

Exit mobile version