Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात दुचाकींची चोरी करणारे तिघे एलसीबीच्या ताब्यात; चोरीची दुचाकी हस्तगत

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील विविध भागातून दुचाकीची चोरी करणाऱ्या तिघांना आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तिघांकडून एक चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलीसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकींची चोरी अधिक प्रमाणावर होत आहे. याची दखल घेत पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक तयार करून अमळनेर शहरात रवाना गेले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार दुचाकी चोरणारे चोरट्यांचा सुगावा मिळाला. शहरातील ताडेपूरा भागातून संशयित आरोपी अजय ईश्वर भिल (वय-१९) रा. फकिरवाड, ताडेपुरा, अळनेर, रवि तात्या वैदू (वय-१९) रा. वैदूवाडा, ताडेपूरा आणि सनि अनिल माचरे (वय-१९) रा. ताडेपुरा या तिघांना ताब्यात घेतले. पोलीसांनी खाक्या दाखविताच दुचाकी चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यांच्या ताब्यातील एचएफ डिलक्स कंपनीची दुचाकी हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी तिघांना अमळनेर शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. विजय पाटील, नरेंद्र वारूळे, प्रविण मांडोळे, दिपक शिंदे, उमेशगिरी गोसावी, मुरलीधर बारी आदींनी केली.

Exit mobile version