Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात ठाकरे गटाकडून कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा निषेध

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या बेळगाव प्रश्नी असणाऱ्या वादात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून मोठा वाद चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मांडलेल्या आक्रमक भूमिकेवर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना राज्य सरकार ठाम भूमिका घेत नसल्याची टीका विरोधक करत आहेत. कर्नाटक सरकारने सांगलीच्या जतमधील ४० गावांवर दावा सांगण्याचीही तयारी केल्याचं बोलंल जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगाव हिसकावण्यासाठी चिथावणी खोर वक्तव्य करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. तरी महाराष्ट्राकडे द्वेष भावनेने बोटे दाखवणाऱ्याची शिवसेना कर्नाटकात येऊन पिरघळल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटक च्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे बसस्थानकाजवळ जाहीर निषेध करण्यात आला.

याप्रसंगी तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, उपजिल्हाप्रमुख कल्याण पाटील, शहर प्रमुख सूरज परदेशी, बाळा पवार, विश्वास महाराज, प्रताप शिंपी, चंद्रशेखर भावसार, झानेश्वर पाटील, मनिषा परब, उज्ज्वला कदम, सुनीता माने, सुलतान खान, नितीन निळे, सुन्नूबाई सोनावणे, जीवन पवार, मोहन भोई, अनिल पाटील, अल्पेश पाटील, प्रमोद शिंपी, भरत जाधव, देवेंद्र देशमुख, विमल बाफना, उमेश अंधारे, मयूर पाटील, मनोज सैनानी आदी उपस्थित होते.

Exit mobile version