Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात गोळीबार करून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न

crime 2

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील नवीन प्लॉट भागातील नर्मदा वाडी परीसरात एका व्यापाऱ्यावर अज्ञात चोरट्यांनी गोळीबार करून हातातील बॅग लुटून नेण्याचा प्रयत्न रात्री ११ वाजेच्या सुमारास झाला. या घटनेमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, कृउबा समितीचे संचालक शंकरशेठ बितराई यांचे भाऊ बसंतालाल बितराई व त्यांचा मुलगा अजय दुकान बंद करून घरी परतले. घराजवळ पोहचले असता सेंट्रल बँकेकडून दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलवर आले. त्यांनी दोघांच्या हातातून खाली बॅग व जेवणाचा डबा हिसकावण्याचा प्रयत्न करीत असताना गोळीबार केला. सुदैवाने गोळी दोघांच्या मधून जाऊन भिंतीला लागली.

सदर घटनेचे वृत्त कळताच भरत ललवाणी घटनास्थळी पोहचून त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सपोनि प्रकाश सदगीर, शरद पाटील, रवी पाटील, हितेश चिंचोरे हे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा केला व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. चार वर्षांपूर्वीही याच ठिकाणी या व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न झाला होता. अशा घटना वारंवार घडत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version