Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रा. शशिकांत पाटील यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड

अमळनेर, प्रतिनिधी | प्रा. शशिकांत पाटील यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड अमळनेर येथील रहिवाशी प्रा.. शशिकांत पाटील यांची आय ट्रिपल ई या प्रथितयश आंतराष्ट्रीय संस्थेच्या सकिंट्स व सिस्टिम्स सोसायटीच्या स्टॅडड्स डेव्हलपमेंट विभागाच्या विशेष अधिकार तथा प्रतिष्ठच्या पदावर अर्थात व्होटिंग मेंबर म्हणून निवड करण्यात आली आहे.

 

आय ट्रिपल ई ही अभियांत्रिकी तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रातील प्रथितयश आंतराष्ट्रीय संस्था असून जगभरात त्यांचे सुमारे ४५०००० प्रोफेशनल सदस्य, ३९ सोसायटीज, तंत्रज्ञान समिती व इतर कॉन्सिल्स आहेत. संस्थेचे जगभरात १० विभाग व शेकडो सेक्शन्स आहे. स्टॅन्डर्सस विकसनातील सर्वोत्र व अग्रगण्य संस्था असून अनेक नामवंत शास्त्रज्ञ या संस्थचे क्रियाशील सदस्य व मानद सदस्य आहेत. प्रा. शशिकांत पाटील या संस्थेचे सिनिअर मेंबर असून गेल्या १२ वर्षापासून क्रियाशील सदस्य म्हणून संस्थेच्या विविध सोसायटीज व उपक्रम यांच्या माध्यमातून विविध पदांवर स्थानिक, विभागीय तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वयंसेवी सदस्य पासून प्रतिष्ठेच्या कमिटीजवर कार्यरत आहेत. आय ट्रिपल ई संस्थेच्या सर्किट्स व सिस्टिम्स सोसायटीच्या स्टेटस डेव्हलपमेंट विभागाच्या विशेष अधिकार तथा प्रतिष्ठेच्या पदासाठी नामनिर्देशन समितीतर्फे जगभरातील सदस्यांकडून नामांकन मागविली होती. त्या सदस्यांमधून केवळ चार जणांची जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ वा कालावधीसाठी व्होटिंग मेंबर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या चार जणांच्या विशेष समितीला विशेषाधिकार असतात. समिती सदस्य स्टेंडर्ड्स डेव्हलपमेंटच्या जडणघडण व विविध उपक्रमांत त्यांची मतं निर्णायक असतात. चार जणांमध्ये प्रा. शशिकांत पाटील हे एकमेव सदस्य भारतीय आहेत. प्रा. शशिकांत पाटील हे तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील रहिवाशी असून कोकणातील खालापूर येथील विश्वनिकेतन उद्योजकता, व्यवस्थापन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील संगणक शाख व अभियांत्रिकी विभागात सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. प्रा. शशिकांत पाटील हे अमळनेर येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक एस. बी. पाटील यांचे चिरंजीव असून दिव्यमराठीचे प्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे.

Exit mobile version