Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळगाव येथे बीएसएसएल कार्यालयातील कॉपरची केबल लांबविली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथे अज्ञात चोरट्यांनी बीएसएनएल कार्यालयातील १५ हजार रूपये किंमतीची ३० मीटर कॉपरची केबलची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ५ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथे बीएसएनएल कार्यालयात ६ फेब्रुवारी रात्री १ ते ७ फेब्रुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ३० मीटर कॉपरची जुनी केबल ठेवण्यात आलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही १५ हजार रूपये किंमतीच ३० मिटर कॉपर केबल वायर चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बीएसएनएल उपमंडळाचे अभियंता पंकज भगवानदास रायसिंघानी रा. अमळनेर यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ५ वाता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहे.

Exit mobile version