Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभ्यास व वाचनात सातत्य ठेवुन आपल्या जिवनाची स्वतंत्र वाट निर्माण करा- प्रा.डॉ. संध्या सोनवणे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी खचून न जाता यश संपादन करण्यासाठी संकल्प करावा. अभ्यास व वाचनात सातत्य ठेवावे विद्यार्थ्यांनी जीवनाची स्वतंत्र वाट निर्माण करावी असे मार्गदर्शनात प्रतिपादन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी केले. यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे बक्षीस व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होत्या. यावेळी विविध स्पर्धेत मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना अभिनंदन करून कौतुक केले.

महाविद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महा विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सरस्वती विद्यामंदिर, यावल येथील उपक्रमशील शिक्षक डॉ. एन. डी. महाले होते. या पारितोषीक वितरण सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जाचा चढता आलेख बाबत आढावा दिला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विविध स्पर्धेत मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना अभिनंदन करून कौतुक केले, ज्यांना यश मिळाले नाही त्यांनी खचून न जाता यश संपादन करण्यासाठी संकल्प करावा. अभ्यास व वाचनात सातत्य ठेवावे विद्यार्थ्यांनी जीवनाची स्वतंत्र वाट निर्माण करावी असे मार्गदर्शनात प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी डॉ. एन. डी. महाले यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या यशस्वी जीवनातील सुरुवातीपासून-आतापर्यंतचा प्रवासाबद्दल त्यांच्या जीवनाच्या एका कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले. ते कसे डॉक्टर झाले व कलेक्टर पर्यंतचा प्रवास त्यांच्या कसा होता. याबद्दल कथन केले. विद्यार्थ्यांना प्रत्येकाने प्रत्येक प्रश्नाला सामोरे जावे. जसा विचार कराल तशा भावना तयार होतात, त्याचप्रमाणे वर्तन घडत असते. विचारांना बळकटी पाहिजे. मनुष्य आजन्म विद्यार्थी असावा. आपल्या यशामागे आई-वडील यांच्या नंतर गुरूंना आनंद होतो. असे मार्गदर्शनात म्हटले.

उपप्राचार्य प्रा. संजय पाटील यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना मार्गदर्शन केले की स्वप्न मोठी पहा व वेळेचे नियोजन करा, इतरांपेक्षा वेगळे करायला शिका असा सल्ला दिला.
कार्यक्रमात फरीदा तडवी (टी. वाय. बी. एस्सी.) कोविड- 19 चे परिणाम यावर मनोगत व्यक्त केले. कु. प्रीती निळे हिने ‘बाप’ या विषयावर कविता सादर केली.कु. खुशी लहाने (बारावी कला) हिने कोरोनाचे शिक्षणावर परिणाम यावर मनोगत व्यक्त केले. तर सुचिता बडगुजर हिने देशभक्तीपर गीत सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज पाटील तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए पी. पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Exit mobile version