Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभिनेत्री कंगणा विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

यावल, प्रतिनिधी | देशाला मिळालेल्या स्वातंत्र व थोर पुरुषांचे अवमान करणारे विधान केल्याबद्दल अभिनेत्री कंगना राणौवत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावल तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

देशात वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या सिने अभिनेत्री कंगना राणेौवत हिने देशाला मिळालेला स्वातंत्र्याबद्दल चुकीचे व थोर पुरूषांचे अपमान करणारे विधान अलिकडेच केली आहे. यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे व पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान निवेदनात वादग्रस्त अभीनेत्री कंगना रणेौवत हिने एका मुलाखातीत म्हटले आहे की, भारत देशाला स्वात्रंत हे १९४७ला मिळाले नव्हते. तर ती भिक होती. देशाला खरे स्वातंत्र हे २०१४ साली मिळाल्याचे बेताल व्यक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्याने देशाला स्वातंत्र मिळुन देण्यासाठी आपल्या प्राणाचे बलीदान देणाऱ्या थोर क्रांतीकारक व स्वातंत्र सैनीकांचा घोर अपमान झाला आहे . देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल ही अपमानकारक शब्द वापरल्या बद्दल कंगना रणौतच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व तिला न्यायलयात हजर करावे अशी मागणी एका निवेदनाव्दारे केली आहे. सदर निवेदन पोलीस निरिक्षक एस. बी. पाटील यांना दिले आहेत.

निवेदनावर प्रभाकर अप्पा सोनवणे , शेखर पाटील , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे , कॉंग्रेस शहराध्यक्ष कदीर खान , काँग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ , नगरसेवक मनोहर सोनवणे , खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरूड, काँग्रेसचे कार्यकर्ते पुंडलीक बारी , विक्की गजरे ,चंद्रकला इंगळे,  रहेमान खाटीक , हाजी गफ्फार शाह, शेख नईम शेख शरीफ , माजी नगरसेवक कालु मास्टर , गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगिर आदींनी सह्या केल्या आहेत.

Exit mobile version