Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अभिनेते शरद पोंक्षे यांच्या कारवर दगडफेक !

अहमदनगर (वृत्तसंस्था) वीर सावरकर यांचे काम महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा सरस आहे, असं वादग्रस्त वक्तव्य करणारे अभिनेते शरद पोंक्षे यांच्या कारच्या काचा फोडल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे.

 

अहमदनगरमध्ये १०० वी अखिल भारतीय नाट्य परिषद होणार आहे. त्यासंदर्भातली माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार जिथे पार्क करण्यात आली तिथे कारवर दगडफेक करण्यात आली आहे. काही अज्ञातांनी अहमनगरमध्ये शरद पोंक्षे यांच्या कार काचा फोडल्या आणि तिथून पसार झाले. या हल्ल्याच्या वेळी शरद पोंक्षे कारमध्ये नव्हते. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही.

Exit mobile version