अभिनेता सोनू सूद शरद पवारांना भेटला

 

मुंबई: वृत्तसंस्था । अभिनेता सोनू सूद पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सोनू सूदनं भेट घेतली आहे. सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जूहू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे चर्चेत आला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची देखील सोनू सूदनं यापूर्वी भेट घेतली होती.

मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामाबद्दल अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले, असा आक्षेप नोंदवला पालिकेने नोंदवला होता. सोनू सूदनं यानंतर मुंबई उच्च न्यायालयात बीएमसीच्या नोटीसला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 13 जानेवारीपर्यंत सोनू सूद विरोधात काहीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सोनू सूदच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

अभिनेता सोनू सूदनं लॉकडाऊन काळात गरजूंना मदत केली होती. सोनू सूदच्या या कामाचं कौतुक करण्यासाठी रोहित पवारांनी जून महिन्यात सूदच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. ‘घर जाना हैं’ हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोहोचवणाऱ्या सोनू सूद यांची त्यांच्या घरी भेट घेतली” अशी माहिती रोहित पवार यांनी ट्विटरवरुन दिली होती.

“तुम्हाला भेटून आनंद झाला भाऊ. चांगले काम चालू ठेवा. तुमचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. प्रत्येक स्थलांतरितासाठी उपलब्ध राहण्याचा मी प्रयत्न करत आहे. शेवटची स्थलांतरित व्यक्ती घरी पोहचेपर्यंत मी परिश्रम घेत राहीन” अशा शब्दात सोनूने रोहितचे आभार व्यक्त केले.

बीएमसीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं, “सोनू सूद यांनी स्वत: जमिनीच्या वापरावर बदल केला आहे. त्याशिवाय निश्चित प्लानमध्ये अतिरिक्त निर्माण करुन रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरीत केलं. यासाठी त्यांनी अथॉरिटीकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली नाही.”

बीएमसीने सोनू सूदवर नोटीसकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला आहे. नोटीस दिल्यावरही ते अनधिकृत निर्माण करत राहिले. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश आणि नगररचना कायदा कलम ७ अंतर्गत गुन्हा केला आहे.

Protected Content