Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अबब…जिल्ह्यात आज १८६ कोरोना बाधीत; जळगावात सर्वाधीक रूग्ण

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल १८६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगावात सर्वाधीक पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले असून जामनेर, रावेर व एरंडोलातही संसर्ग वाढल्याचे अधोरेखीत झाले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार जिल्ह्यात आज तब्बल १८६ रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक रूग्ण संख्या ४४ ही जळगावात आहे. याच्या खालोखाल एरंडोल, जामनेर व रावेरात प्रत्येकी १९; अमळनेर-१७; भुसावळ-५; चोपडा-९; पाचोरा-८; भडगाव-३; धरणगाव-८; मुक्ताईनर, यावल व चाळीसगाव-प्रत्येकी ५; पारोळा-३, बोदवड-११; जळगाव ग्रामीण-६ असे रूग्ण आढळून आले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे आज ७४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आजवर १९१३ रूग्णांनी कोरोनाला हरविले आहे. तर आजच्या रूग्णांमुळे जिल्ह्यात आजवर कोरोना बाधीत रूग्णांची संख्या ३२६८ इतकी झाल्याचे दिसून येत आहे. आज कोरोनाचा उपचार घेणार्‍या रूग्णांपैकी चौघांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा २२५ इतका झालेला आहे.सध्या जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या ११३० इतकी झाल्याचे या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version