Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अफवांना बळी न पडता ‘कोविशील्ड’ लसीकरण यशस्वी करा — रवींद्र पाटील (व्हिडिओ )

 

यावल, प्रतिनिधी । आपल्याकडील कोरोनाची लस ‘कोविशील्ड’ ही पुर्णपणे सुरक्षित असून या लसबाबत बऱ्याच प्रमाणात गैरसमज पसवरले जात आहेत तरी नागरीकांनी अशा प्रकारच्या अफवांना बळी न पळता या लसीकरण यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा परिषदचे आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी येथील ग्रामीण रूणालयात आज ‘कोविडशिल्ड’ लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

‘कोविडशिल्ड’ लसीकरणच्या प्रथम चरणात आरोग्य सेवेत कार्य असणारे अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनाही लस दिली जाणार आहे. दरम्यान आज दिनांक २५ जानेवारी रोजी यावल येथील ग्रामिण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधीत लसीकरणाचे कार्यक्रम शुभारंभ जिल्हा परिषदचे आरोग्य समितीचे सभापती रवींद्र उर्फ छोटु पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांना सर्वप्रथम लसीकरण करून या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. पहील्या टप्यात सुमारे १२५ आरोग्य कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार ,यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, नगर परिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी, नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते यांच्यासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक व कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

 

 

Exit mobile version