Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अफगाणिस्तानचे चौथे मोठे शहर ‘मजार-ए-शरीफ’वर तालिबानाचा कब्जा

 

काबुल : वृत्तसंस्था । अफगाणिस्तानमधील चौथे मोठे शहर असलेल्या ‘मजार-ए-शरीफ’वर आता तालिबानाने ताबा मिळवला आहे.

 

आता अफगाणिस्तान सरकारच्या हातून हळूहळू एक-एक शहरं निसटत असल्याचे दिसत आहे.काबुल आणि जलालाबाद सोडून तालिबानकडून उत्तर अफगाणिस्तानमधील एक प्रमुख शहर असलेल्या मजार-ए-शरीफ वर ताबा मिळवण्यात आला आहे. कारण, अफगान सैन्य आणि सरकारचं समर्थन करणारे मिलिशिया पळून गेले आहेत.  तालिबानने म्हटले आहे की, ”इस्लामिक अमीरात (तालिबान) त्यांचे जीवन, संपत्ती आणि सन्मानाच्या रक्षणासाठी नेहमीप्रमाणे काम करेल आणि आपल्या प्रिय राष्ट्रासाठी शांतीपूर्ण आणि सुरक्षित वातावरण तयार करेल.”

 

सुन्नी पश्तून समूहाने सांगितले आहे की, त्यांच्या त्वरीत यशाने लोकांची स्वीकृती दर्शवली आहे. तसेच, अफगाण व विदेशींना हे आश्वासन दिले की त्यांचे नुकसान होणार नाही. मजार-ए-शरीफचे स्थानिक असलेल्या अतीकुल्ला गयूरने  सांगितले आहे की, ते आपल्या कार आणि दुचाकीवरून परेड करत आहेत आणि आनंदात हवेत गोळीबार करत आहेत.

 

अफगाण पत्रकार बिलाल सरवरीने ट्विट केलं आहे की, मजार-ए-शरीफ येथील काही भागात अराजकतेचे दृश्य आहे आणि अफगाण सैन्याला पळताना पाहिलं गेलं. सरवरीने म्हटले आहे, स्थानिकांपैकी एकाने मला सांगितलं की शहरात दहशत, भीती आणि संघर्षाची शक्यता आहे.

 

तालिबान बंडखोरांनी मजार ए शरीफ वर जवळपास निर्विरोध प्रवेश केला, कारण सुरक्षा रक्षक राजमार्गावरून शेजारील उज्बेकिस्तानच्या दिशेने पळाले. सोशल मीडियावरील अनेक व्हिडिओंमध्ये अफगाणिस्तान आणि उज्बेकिस्तानमधील हेरातन दरम्यान असलेल्या लोखंडी पुलावर अफगाण सैन्याची वाहनं आणि सैन्य वर्दीतील व्यक्ती दाखवलं गेलं आहे.

 

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी बुधवारी मझार ए शरीफ येथे आले होते.  त्यांनी संरक्षक फळी उभारण्यासाठी सरकारशी सहमत असलेल्या काही बंडखोरांची बैठक घेऊन त्यांच्या कमांडर्सना बचाव करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पाकिस्तानला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांताच्या राजधानीवर तालिबानने कब्जा मिळवला असल्याची माहिती  एका लोकप्रतिनिधीने दिली होती. या प्रांताची राजधानी शरना ही बंडखोरांच्या हाती गेल्याचे या प्रांतातील लोकप्रतिनिधी खालिद असद यांनी सांगितले.  काही आठवड्यांत तालिबानने देशाच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भागांमध्ये वेगाने आगेकूच केली आहे.

 

Exit mobile version