Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपात्र उमेदवारांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यपदी नियुक्ती

 

 

 

जळगाव : प्रतिनिधी ।   कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या  दोन अधिष्ठाताची पात्रता नसतानाही व्यवस्थापन परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप शैक्षणिक वर्तुळातून होत आहे

 

या  विद्यापीठामध्ये सुरु असलेल्या भोंगळ कारभाराविरोधात एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी अनेकदा आवाज उठवलेला आहे.  मनमानी

कारभाराला कंटाळून  तत्कालीन  कुलगुरू डॉ पी पी पाटील यांनी राजीनामा दिला होता असे मराठे यांचे म्हणणे आहे

 

प्राचार्य राजेंद्र पाटील ( कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शहादा जि  नंदुरबार  ) व  प्राचार्य पी पी छाजेड ( पालेशा महाविद्यालय ,  धुळे ) यांची अधिष्ठाता विभागामार्फत   व्यवस्थापन परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी या नियुक्तीला आक्षेप  घेतला. असून त्यासंबंधीचे सर्व पुरावे देण्याची तयारी असल्याचे मराठे यांनी  सांगितले

 

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार व्यवस्थापन परिषद सदस्य हा विद्यापीठाचा अधिष्ठाता तसेच पूर्णकालीन वेतन अधिकारी असावा  परंतु नियुक्तीची ही  अट नियुक्त झालेल्या सदस्यांकडे नाही  सध्या नियुक्त झालेल्या सदस्यांकडे विद्यापीठाच्या कला व वाणिज्य विभागाचा प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यभार आहे. सदस्य हा पूर्णवेळ अधिष्ठाता असावा  ही नियमबाह्य  नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी  मागणी एन एस यु आय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे .

 

आता  काही महिन्यांमध्ये विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू प्राप्त होतील. येणाऱ्या कुलगुरूनी मागील काळातील भ्रष्टाचाराबद्दल व गैरकारभाराबद्दल चौकशी नेमल्यास विद्यापीठातील अनेक अधिकारी, सदस्य अडकतील याची खात्री असल्यामुळे विद्यापीठाच्यावतीने आतापासूनच मोर्चेबांधणी करित विद्यापीठाच्या रिक्त झालेल्या जागांवरती पुढील अडीच वर्षांसाठी पात्रता नसली तरीही मर्जीतील अधिकारी विद्यापीठाच्या विविध पदांवर बसवण्याचे प्रयोग सुरू आहेत . केवळ  भ्रष्टाचार लपविण्याकरता संबंधितांनी  हा कारभार  केलेला असेल तर एन एस यु आय या गैरकारभाराला कदापि यशस्वी होऊ देणार नाही  ह्या नियमबाह्य नियुक्त्या  रद्द  न झाल्यास  एन एस यू आईच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिला आहे

 

एन एस यू आई जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी  राज्यपाल ( कुलपती )  व  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली.आहे

 

Exit mobile version