Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघात नव्हे हे तर मॉक ड्रील ! : रेल्वे प्रशासनातर्फे घोषणा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव ते शिरसोलीच्या दरम्यान आज दुपारी रेल्वे घसरल्याचा संदेश सर्वत्र पाठविण्यात आल्यानंतर खळबळ उडाली असतांना हे मॉक ड्रील करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, आज दुपारी जळगाव ते शिरसोलीच्या दरम्यान अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या अपघाताला रेल्वे प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला. तथापि, सुमारे एक तासानंतर हे मॉक ड्रील असल्याची अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे.

या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजवर प्रकाशित करण्यात आलेले वृत्त खालील प्रमाणे आहे.

०१०७२ अप कामयानी एक्सप्रेस ही भुसावळकडून मुंबईकडे जात असतांना शिरसोली व म्हसावदच्या दरम्यान या ट्रेनचे तीन डबे घसरल्याची माहिती समोर आली आहे. डबे घसरून पडल्यामुळे मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरू केले आहे. या अपघातामध्ये नेमकी किती हानी झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या जनसंपर्क अधिकार्‍याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा अपघात अप लाईन खंबा क्रमांक ४०३/२३ जवळ घडली आहे. या संदर्भात माहिती मिळताच रेल्वे प्रशासनातील उच्च अधिकार्‍यांनी अपघातस्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, ही कोविड स्पेशल ट्रेन असून यात एफ. आय. खान हे गार्ड होते. त्यांनीच अपघाताची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली असून भुसावळ येथून अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. तर यात काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र हा या अपघाताला रेल्वे प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला. तथापि, सुमारे एक तासानंतर हे मॉक ड्रील असल्याची अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे.

Exit mobile version