Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघात जखमी झालेल्या कामगाराची नुकसान भरपाईची मागणी

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील एमआयडीसी मधील शांती पल्सेस या कंपनीतील बिहारी कामगाराचा अपघात होऊन त्याच्या हाताची बोटे मशीनमध्ये आल्याने तुटून गेले आहेत. कंपनी मालक नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्या कामगाराने औदयोगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उप संचालक यांच्याकडे कंपनी मालकाने ५ लाखांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

सुरेश प्रसाद हा कामगार शांती पल्सेस या कंपनीत मागील ६ ते ८ महिन्यांनापासून कार्यरत आहे. तो २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळ ६ च्या शिफ्ट दरम्यान काम करीत असतांना एअर लॉक मशीनची ग्लास बसवीत असतांना सुरेश प्रसाद याच्या उजव्या हाताची चार बोटे लोखंडी पात्यामध्ये अडकून त्यांचे बोटे कायमस्वरुपसाठी नुकसान झाले आहे. तरी त्यांना कंपनी मालकाने ५ लाखांची मदत व इतर शासकीय अन्य फायदे मिळावेत अशी मागणी उप संचालक याना करण्यात आली आहे.

दरम्यान, कंपनी सतत कामगार कायदे पायदळी तुडवत आहे. या कंपनीमध्ये साधारण आठ महिन्यापूर्वी एक कामगाराचा जीव गेला होता आणि कंपनी प्रशासनाने त्या कामगाराच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई न देता निव्वळ टोलवा टोळवी केली. तसेच आता एका कामगाराचे बोटे मशीन मध्ये तुटून तो कायमचा रोजगरहीन झाला. कंपनी त्यास नुकसान भरपाई न देता वरून दमदाटी करत आहे. याप्रकरणी कामगार आयुक्त आणि पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैशाली झाल्टे यांनी केली असून न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

Exit mobile version