Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघातात पाच वर्षीय बालक जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळ कारच्या धडकेत पाच वर्षे बालक झाल्याची घटना घडली होती. या अपघात प्रकरणी कारचालक महिले विरुद्ध शनिवार 7 जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील वाघनगर येथे हेमंत रतिलाल भोई वय 34 हे कुटुंबासह वास्तव्यास आहे. 5 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता हेमंत भोई हे त्यांचा मुलगा रोनित याच्या सोबत गणेश कॉलनी परिसरात बजरंग बोगद्या जवळ आले होते. यादरम्यान एम.एच.19 बी.जे.5700 या क्रमांकाच्या कारने रोनीत यास धडक दिली. या धडकेत डोक्याला, कपाळावर, गुडघ्या जवळ, तसेच पोटावर गंभीर दुखापत झाली. यात रोनीत जखमी झाला. अपघातानंतर कार चालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाले. मुलावर उपचारानंतर दोन दिवसानंतर हेमंत भोई यांनी शनिवार, 7 जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून अपघातात कारणीभूत कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहे.

Exit mobile version