Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघातात व्यावसायिक नरेश खंडेलवाल यांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी l येथील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते नरेश खंडेलवाल यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नरेश खंडेलवाल हे आपल्या मित्रांसह सुरत येथे गेले होते. तेथून परत येत असताना नवापूर जवळ त्यांच्या कारला झालेल्या अपघातात खंडेलवाल यांचा मृत्यू झाला आहे. समोरून येणाऱ्या ट्रकने मारलेल्या कट मध्ये त्यांच्या डोक्याला जबर फटका बसल्यामुळे त्यांचे निधन झाले. तर त्यांच्यासोबतच्या तिघांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान नरेश खंडेलवाल यांचे अपघाती निधन झाल्याची वार्ता येतात व्यवसायिक विश्वावर शोककळा पसरली आहे.

Exit mobile version