Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ रस्त्यावरील हॉटेल त्रिमुर्तीजवळ भरधाव दुचाकीने उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने कंपनीतून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे

हरेश्वर गोपाळ चौधरी (वय-५५) रा. भादली ता.जि.जळगाव असे मृत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

 

जळगाव तालुक्यातील भादली येथील रहीवासी हरेश्वर चौधरी हे पत्नी, मुलगा आणि मुलीसह वास्तव्याला आहे. जळगाव एमआयडीसीतील एका बॉयलर कंपनीत कामाला आहे. शुकवारी रात्री ८ वाजता कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकी (एमएच १९ बीएल २८९९) ने निघाले. जळगाव-भुसावळ महामार्गावरील हॉटेल त्रिमुर्ती जवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या उभ्या कंटेनर (एचआर ३८ ए ७२२२) ला जोरदार धडक दिली. या अपघातात हरेश्वर चौधरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची माहिती मिळतात पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी , सहाय्यक फौजदार सुरेश अहिरे , विकास सातदिवे , साईनाथ मुंडे यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आला. दरम्यान मयत हरेश्र्वर यांच्या पश्चात पत्नी मालतीबाई, मुलगा वैभव आणि विवाहित मुलगी सुवर्णा असा परिवार आहे.  दुचाकीस्वार हरेश्वर चौधरी हे स्वत:च्या मृत्यूस स्वत:च कारणीभूत ठरल्याची तक्रार  एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस  कॉन्स्टेबल मंदार पाटील यांनी दिली असून त्यावरुन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दिपक जगदाळे हे करीत आहेत.

Exit mobile version