अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवार २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमोल आनंदा सपकाळे (वय-२४) रा. दाभाडी ता.जि.जामनेर ह.मु. बेळी ताजि.जळगाव  असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की,  अमोल सपकाळे  हा तरूण आपल्या परिवारासह जळगाव तालुक्यातील बेळी येथे वास्तव्याला होता.  अमोल सपकाळे हा तरूण कामाच्या निमित्ताने नशिराबाद गावाजवळून दुचाकीने जात असतांना त्याला मागून भरधाव रिक्षाने जोरदार धडक दिली होती. या धडकेत अमोल हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने नजीकच्या डॉ. उल्हास पाटील मेडीकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमी तरूणावर उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत गुरूवार २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता  नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.

Protected Content