Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अपंग, वयोवृद्ध नागरीकांना स्थानिक पातळीवर प्रमाणपत्र मिळावेत : योगिता पाटील यांची मागणी

यावल,  प्रतिनिधी | संजय गांधी निराधार समितीच्या  तालुका सदस्यपदी  योगिता देवकांत पाटील यांची नियुक्ती होताच  त्यांनी आमदार शिरीष चौधरी यांना  निवेदन देवून या योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

निवेदनाचा आशय असा की,  संजय गांधी निराधार योजनेत व श्रावणबाळ व अपंग लाभार्थी यांना या योजने कमी वयाचा दाखला व वैद्यकीय प्रमाणपत्र  दाखले मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.   वयोवृद्ध नागरीकांना दिले जाणारे वयाचे दाखले तसेच अपंगांना दिले जाणारे दाखले हे यावल येथून  मिळवे. यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करावेत. कारण ज्या नागरिकांकडे  जन्मदाखला, लिव्हिंग सर्टिफिकेट नाही  व जे अपंग नागरिक आहेत त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र  मिळवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी जळगाव यांच्याकडे जावे लागते.  त्यासाठी नागरिकांची धावपळ होऊन वेळ व पैसा खर्च होतो. अपंगांना होणारे हे त्रास व गैरसोय टाळण्याकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात  वयाचे व अपंग व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणात पत्र  मिळावेत.

दरम्यान,  या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना कसा मिळेल या साठी समाजातील सर्वच राजकीय, सामाजिक  क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घ्यावा व अनाथ व अपंग व  निराधाराना मदत करावी  असे आवाहन  योगिता पाटील यांनी  केले. याप्रसंगी निवेदन देतांना योगिता पाटील यांच्यासह कविता पाटील , वढोदे गावचे सरपंच तथा संजय गांधी  समिती सदस्य  संदीप सोनवणे,  संजय गांधी समिती सदस्य  दिनकर सिताराम पाटील, उंटावद विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व   विरावली ग्राम पंचायत सदस्य अॅड. देवकांत पाटील, राष्ट्रवादी युवक  राजेश कारांडे  यांचे सह अनेक पदअधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती .निवेदन देने पूर्वी यावल येथील खरेदी-विक्री संघात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरिष  मधुकरराव चौधरी यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष शेखर सोपान पाटील व समितीच्या सर्व सदस्यांचे स्वागत केले आहे

 

Exit mobile version