Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अन्यथा महावितरण आणि बेस्टला आम्हाला झटका द्यावा लागेल; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारने महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी, अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज यांनी दिला आहे. वाढीव लाईट बिलसंदर्भात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिले आहे.

 

 

लॉकडाऊनच्या काळात सरकारी आणि खासगी वीज कंपन्यांनी ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलं पाठवली आहेत. वीज कंपन्यांनी पाठवलेली बिलं म्हणजे ग्राहकांची लूट आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उदरनिर्वाहाची शाश्वती नसताना वाढीव वीज बिल पाठवणे म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करण्यासारखे असल्याचे राज यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. लॉकडाउनच्या काळात संपूर्ण व्यवहारांना बंदी असल्याने वीजबिलं पाठवण्यात आली नव्हती. जूननंतर वीजबिले देण्यास सुरूवात झाली असून, वीजबिलाची रक्कम बघून अनेकांना शॉक बसला आहे. या मुद्यावर सर्वसामान्यांपासून चित्रपट सृष्टीतील कलाकारांनीही आवाज उठवला होता. मात्र, त्याची फारशी दखल घेतली न गेल्याचे चित्र आहे. वीजबिलाच्या मुद्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच सरकारचे लक्ष वेधले आहे.

 

 

Exit mobile version