Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अनुभूती शाळेत आषाढी एकादशी निमित्त भजन, दिंडी आणि पालखीचा सोहळा झाला. दिंडीत ४३० मुले सहभागी झाले.

 

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी लाहोटी यांनी विठ्ठल रुक्मीणीच्या मुर्तीचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. मुले विठ्ठल रुक्मीणीच्या वेषात सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या गजरात मुलांनी टाळ वाजवत ताल धरला, फुगड्या खेळल्या व रिंगण तयार केले.

 

मुख्याध्यापिका श्रीमती रश्मी लोहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुकीर्ती भालेराव, प्रियंका श्रीखंडे, श्वेता कोळी, अरविंद बडगुजर, नाना सर आणि शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रमांचे परिश्रम घेतले. शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले आणि सहभागी मुलांचे कौतुक केले.

Exit mobile version