Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनिल भाईदास पाटलांना मंत्रीपद ? : अजितदादांसोबतच्या निष्ठेचे फळ मिळण्याची शक्यता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ मंत्री आज मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता असून यात अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा समावेश असल्याचीही शक्यता आहे.

अजित पवार यांच्यामुळे आज राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ते आपल्या सहकार्‍यांसह आज मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नऊ मंत्री शपथ घेणार असून यात अजित पवार यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांची शक्यता आहे. यात ज्येष्ठ नेत्यांसह काही पवार यांच्या निष्ठावंतांचाही समावेश आहे. यामध्ये अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचे देखील नाव असल्याची माहिती विविध वाहिन्यांनी दिलेली आहे.

अनिल भाईदास पाटील हे अजितदादा पवार यांचे अतिशय जवळचे सहकारी असून पहाटेच्या शपथविधीच्या प्रसंगात देखील ते त्यांच्या सोबत होते. यानंतरच्या कालखंडातही ते अजितदादांचे निकटवर्तीय म्हणूनच ओळखले जात आहेत. यामुळे त्यांचे नाव देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात आहे. असे झाल्यास जळगाव जिल्ह्यास तिसरा लाल दिवा मिळणार आहे. याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version