Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनियमिततेने काम करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांना तात्काळ निलंबित करा – योगेश पवार

अमळनेर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिवद येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी बेकायदा पद्धतीने दोघा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लाभ मिळवून दिल्याचे चौकशीत सिद्ध झाल्याने त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.

 

दहिवद येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी संजीव साहेबराव सैदाणे यांनी ग्रामपंचायत मधील शासकीय सेवेत असलेल्या २ व्यक्तींना दिव्यांग ५% निधीतून मालमत्ता करात १०,५५०/- रुपये तर दुसऱ्या व्यक्तीस १४१८/- रुपये सूट दिली होती. ही बाब प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. या बाबत अमळनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी हिरालाल वाघ यांनी अर्जानुसार ग्रा.पं जाऊन चौकशी केली असता तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी लाभ दिल्याचे सिद्ध झाले. यानुसार गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी अनियमितता केल्याने प्रशासकीय कारवाईस पात्र असल्याचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव यांना सादर केला आहे. यातील काही अधिकारी दुर्लक्ष करत असून ना.बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेने राज्य उपाध्यक्ष अभय पवार सह खजिनदार अॅड. कविता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी वेळोवेळी अश्या अनियमिततेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कायद्याने प्रहार केला आहे. तरी या ग्रामविकास अधिकारी कडून भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार असल्याची शक्यता नाकारता येत नसून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन जि. प कडून निश्चितच आम्ही कारवाई करू असे आश्वासन डॉ.पंकज आशिया यांनी दिले. अश्या अधिकारीचे त्वरित निलंबन करावे अशी मागणी योगेश पवार, जितेंद्र पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version