Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“अनबिलेव्हेबल सावरकर भगुर’ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील कलाकार व भडगाव येथील कलाशिक्षक योगेंद्र रघुनाथ पाटील यांच्या सावरकरांच्या जिवनावरील “अनाविलीव्हेबल सावरकर भगूर ते अंदमान” या चित्रप्रदर्शनांचे उदघाटन काल मुंबईत झाले असून ते रसिकांच्या भेटीला येत्या २८ फेब्रुवारीला येत आहे.

मुंबई येथे काल २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर (मुंबई) येथे श्रीमती अशिलता राजे (सावरकर) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून सदर चित्रपट हे २८ फेब्रुवारी पर्यंत रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या प्रदर्शनात एकूण ३० चित्रांचा समावेश असून प्रत्येक चित्रातील रेषा बोलकी व हदयस्पर्शी आहे. दरम्यान रंगही सावरकरांच्या व्यक्तिमत्वानुसार अतिशय सुंदर केलेली आहे. सावरकरांच्या जिवनातील प्रत्येक प्रसंग त्यांनी खूप बारकाईने अभ्यासकरून मांडला आहे. जगातील महापुरुषांची जिवनयात्रा ही हमखास वेदनादायी असते. हे प्रखर सत्य या चित्रांवरून स्पष्ट होणार आहे. गेल्या १०-१२ वर्षात त्यांनी केलेल्या सावरकरांच्या प्रदीर्घ अभ्यासातून “अनबिलीव्हेबल सावरकर’ ही चित्रमालिका साकार झाली आहे. तत्पूर्वी या चित्रप्रदर्शनास स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याअध्यक्ष रणजीत सावरकर, जे. जे इंस्टीट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मुंबईचे प्राध्यापक डॉ. शेपाळ, आटिस्ट व ललित कला केंद्र चोपडाचे प्राचार्य राजेंद्र महाजन, श्रेयस मेडिकल फाउंडेशन पाचोराचे अध्यक्ष डॉ. जयंतराव पाटील, प्रख्यात चित्रकार पिसुर्वे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सावरकरांचे प्रेरणादायी विचार संपूर्ण भारतभर, तरागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याच्या व भविष्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन भरवण्याचा योगेंद्र पाटील यांचा मानस असल्याचे त्यांनी “लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना सांगितले आहे.

Exit mobile version