Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अधिष्ठाता डॉ. रामानंद यांचे ‘एनएसयूआय’तर्फे स्वागत

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार नवनियुक्त डॉ. जयप्रकाश रामानंद आज स्विकारला. एनएसयूआय संघटनेतर्फे चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे या नावाचे पुस्तक भेट देऊन नवीन अधिष्ठांताचे स्वागत केले.

आज दुपारी जळगाव शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार नवनियुक्त अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी स्वीकारला. त्याप्रसंगी जळगाव जिल्ह्यामध्ये स्वागत म्हणून जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी अभिनंदन केले. नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनीसुद्धा कोरोना या महासंकटावर मात करून जळगाव जिल्हा कोरोनामुक्त करावा याबाबत चर्चा केली.

Exit mobile version