Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अत्यंत धक्कादायक….! जिल्ह्यात तब्बत ७१ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून आकडा चांगलाच फुगत चालला आहे. आजची धक्कादायक बाब म्हणजे तब्बल ७१ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. आत्तापर्यंत रूग्ण संख्या ८७१ झाली असून नऊशेकडे वाटचाल सुरू झाली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या माहितीनुसार जळगाव शहर २४, भुसावळ ८, अमळनेर ३, चोपडा ६, पाचोरा १, धरणगाव १, यावल ४, एरंडोल १, जामनेर २, जळगाव ग्रामीण २, रावेर ४, पारोळा ८, चाळीसगाव १, मुक्ताईनगर ५, दुसऱ्या जिल्ह्यातील असे ७१ रूग्ण आज आढळून आल्याने वातावरण अत्यंत गंभीर व चिंताजनक झाले आहे. आज एकुण ७१ रूग्ण आढळून आल्याचे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकुण बाधित रूग्णांची संख्या ८७१ वर पोहचली असून लवकरच हा आकडा हजार पर्यंत जायला वेळ लागणार नाही.

शासनाच्या नियमांचे नागरीकांनी पालन करणे गरजेचे आहे. जरी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी नागरिकांनी कोरोना विषाणूपासून स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. विनाकारण बाहेर फिरणे आतातरी टाळा, घरातच सुरक्षित रहा असे जिल्हा प्रशासन वारंवार आवाहन करत आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज भेट
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज जळगाव जिल्ह्यातील वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियोजन भवनात आढावा बैठक घेतली आणि परिस्थिती जाणून घेतली. कोरोना रोखण्यासाठी खबरदारी घेवून कोरोना रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा अधिका गतीमान करण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या व काहींची कानउघडणी केली.

Exit mobile version