Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अतिवृष्टी बाधित रखडलेल्या अनुदानसाठी ना. मुंडे यांना साकडे (व्हिडिओ)

अमळनेर गजानन पाटील |सन २०१९ सालचे अतिवृष्टी बाधित ५२ गावांपैकी सुमारे ३८ गावांचे अनुदान रखडले आहे. |सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे हे अमळनेर दौऱ्यावर असताना आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती.

 

अतिवृष्टी बाधितांना अनुदान मिळण्याबाबत विविध ठिकाणी मंत्री तसेच वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून देखील अद्याप न्याय मिळालेला नाही.असे एक ना अनेक समस्याचे निवेदन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आपने मांडल्या. मंत्री. ना. मुंडे हे गाडीतून खाली उतरत नव्हते, परंतु, यावेळी ना. मुंढे यांना अखेर खाली उतरावे लागले.. शेतकरी प्रश्नावर शासन त्वरित निर्णय घेईल या बाबत प्रयत्न करतो असा शब्द देत मंत्री धनंजय मुंडे यांची गाडी अखेर मार्गस्थ झाली! आम आदमी पार्टीच्या वतीने अवकाळी पाऊस नुकसान व पीक विमा सह शेतकरी अन्यायाबाबत सातत्याने आवाज उठवला जात आहे.मंत्री ना. धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले. आम आदमीच्या वतीने डॉ रुपेश संचेती, शेतकरी नेते शिवाजी दौलत पाटील, तालुका समन्वयक संतोष पाटील, तालुका सचिव भुपेंद्र पाटील, उत्कर्ष पवार, राजुद्दीन काझी, नितीन चैनसुख जैन, कृष्णा भालेराव, किशोर पाटील, एम के पाटील, शोहेब शेख, रियाज बागवान, सचिन परदेशी, मधुकर पाटील, दिलीप पाटील, रामचंद्र पाटील, शोभराज पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते निवेदन सादर करणार असल्याची पूर्व सूचना पोलिसांना नसल्यामुळे मंत्र्यांचा ताफा आपने अचानक रोखल्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

 

Exit mobile version