Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अतिवृष्टीमुळे हिवरा नदीला पूर; पाचोर्‍यातील पूर्व-पश्‍चीम संपर्क तुटला

पाचोरा प्रतिनिधी । अजिंठा डोंगर रांगांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हिवरा नदीला मोठा पूर आला असून यामुळे पाचोरा शहरातील पूर्व व पश्‍चीम भागाचा संपर्क अनेक तासांपर्यंत तुटला होता.

अजिंठा डोंगररांगा भागात रविवारी मध्यरात्री अतीवृष्टी झाली. यामुळे हिवरा नदीला मोठा पूर आला. पाचोरा शहरातील कृष्णापुरीतील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे शहराच्या पूर्व-पश्‍चिम भागाचा संपर्क अनेक तासांपर्यंत तुटल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. परिणामी भडगाव रोडवरील मुख्य रस्त्यावरूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे.

तर दुसरीकडे पाचोरा तालुक्यातूनच वाहणार्‍या अग्नावती नदीलाही मोठा पूर आल्याने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. नगरदेवळा गावात नदी काठावर फरशी पुलाजवळ असलेल्या टपरी धारकांचेही नुकसान झालेे. तीन भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने वाहून गेली.

Exit mobile version