Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अतिक्रमणधारक हॉकर्सवर कारवाईची बडगा : ११ वजन माप काटे जप्त (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील विविध भागातील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या  हॉकर्सवर वजन माप काटे व प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्तीची कारवाई करण्यात आली.

 

शहरातील विविधी भागातील महापालिका प्रशासनातर्फे अतिक्रमणधारक हॉकर्सवर कारवाई करण्यात आली. सकाळी ११.३० वाजता महाबळ कॉलनी रोडवरील काव्यरत्नावली चौक ते स्वातंत्र्य चौकातील रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करीत असलेल्या फळ विक्रेत्यांवर अतिक्रमण विभागामार्फत धडक कारवाई करण्यात आली. यात ११ वजन माप काटे तसेच त्यांच्याजवळ असलेल्या साधारणतः दोन ते तीन किलो प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहरातील एम. जे. कॉलेज गेट समोरील रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणारे पाणीपुरी व चायनीज गाडी व्यावसायिकांवर तसेच इतर हॉकर्स व्यावसायिकांवर आज संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली. त्यात या हॉकर्स व्यवसायिकांच्या गाड्या जप्त करण्यात आले. हि कारवाई आयुक्त डॉ. विद्या गायकवाड तसेच अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर यांनी त्यांच्या पथकाने केली आहे. जळगाव शहरात यापुढे अशा हॉकर्स व्यावसायिकांवर अतिक्रमण विभागामार्फत अशी कारवाई सतत सातत्याने करण्यात येईल असे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नेहमीच गजबजलेल्या सुभाषचंद्र बोस चौकात रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीस अडथळा निर्माण करून उभ्या असणाऱ्या खासगी वाहनांवर देखील कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

 

 

Exit mobile version